उद्धवा…..
मी वरून पाहतोय… आणि माझ्या शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरची निराशा मला अस्वस्थ करतेय.
मी वरून पाहतोय.
आजही माझी नजर मुंबईवर आहे,
महाराष्ट्रावर आहे,
माझ्या हिंदू समाजावर आहे.
आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्याकडे आहे.
पण आज त्या झेंड्याचा रंग फिकट वाटतोय.
मुंबई महानगरपालिका असो की संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका,
शिवसेनेचा जो पराभव झाला,
तो आकड्यांचा नाही,
तो तू केलेल्या
गलत संधी साधू राजकारणाचा परिणाम आहे.
उद्धवा….,
तू फक्त निवडणूक हरलास असं नाही,
तू मी उभी केलेली शिवसेना हरवलीस.
काँग्रेससोबत युती केलीस,
तेव्हाच पहिली चूक झाली.
जेव्हा समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केलीस,
तेव्हा हिंदू समाजाच्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला….
“ही शिवसेना आहे का?”
मुस्लिम मतांचा हिशेब मांडताना
तू हिंदू मतदार गृहीत धरलास.
तू हा सगळ्यात मोठा भ्रम बाळगलास,
अरे उद्धवा…,
हिंदू कधीही लाचार नसतो,
पण आपण फसवला गेलो असं त्याला वाटलं,
तर तो हिंदू शांतपणे दूर जातो.
आतंकवाद्यांशी सहानुभूती असलेल्या,
राष्ट्रविरोधी वक्तव्यांची पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट देण्यात आलं
तेव्हा शिवसैनिकांच्या डोळ्यात
मी पहिल्यांदा अपमान पाहिला.
मी शिवसेना घडवली
मराठी माणसासाठी,
हिंदू अस्मितेसाठी,
आणि राष्ट्राभिमानासाठी.
ती तू कुठे नेऊन ठेवलीस?
आज मला दुःख होतंय पण ते
उद्धव ठाकरे म्हणून तुला पाहून नाही होत,
मला दुःख होतंय ते
माझ्या विचारांवर विश्वास ठेवून
शिवसेना उभी करण्यासाठी
त्या घाम गाळलेला शिवसैनिक
माझ्या एका हाके सरशी
हिंदूंच्या रक्षणा करतात रस्त्यावर येणाऱ्या
त्या शिवसेनिकांच्या त्या
निराश अन् हताश चेहऱ्याकडे मी पाहतोय,
ज्यांनी माझ्या एका हाकेला
घरदार सोडून प्रतिसाद दिला होता.
ते सैनिक आज विचारतात
“साहेब, आम्ही कुठे चुकलो?”
नाही,
त्यांची कोणतीही चूक नाही.
उद्धवा ….
चूक तुझ्या नेतृत्वाची आहे.
नेतृत्व जर संभ्रमात असेल,
तर संघटना तुटते.
नेतृत्व विचार सोडून स्वार्थी गणित मांडू लागलं,
तर जनता निकाल लावते.
हिंदू समाजाला तुझ्याकडून अपेक्षा होती
ठाम भूमिका,
निर्भीड आवाज,
हिंदूंच्या रक्षणाची,
त्यांचा बुलंद आवाज होण्याची
आणि कुणालाही न घाबरणारं
बेधडक नेतृत्व होण्याची.
पण तुला सत्तेचा शॉर्टकट हवा होता.
मी कधी शॉर्टकट घेतला नाही.
मी शत्रूशी समोरासमोर लढलो.
माझं राजकारण स्पष्ट होतं,
जो विरोधात आहे, तो विरोधातच.
जो राष्ट्रविरोधी आहे,
जो हिंदूंचा विरोधी आहे,
त्याचा मी विरोधीच.
आज मात्र शिवसेनेची ओळखच पुसली गेली.
उद्धवा,
तुला कळलं नाही
किंवा कळून सुद्धा तू समजून घेतलं नाहीस.
राजकारण हे वारसाहक्काने मिळालेलं सिंहासन नाही,
ते रोज लोकांच्या विश्वासाने कमावावं लागतं.
आज शिवसेनेचं पराभव झाला,
कारण तिने आपली ओळख गमावली.
आणि लक्षात ठेव,
इतिहास पराभव माफ करतो,
पण विश्वासघाताला कधीच माफ करत नाही.
मी वरून पाहतोय…
आणि आजही सांगतोय,
शिवसेना कधीही सौद्यांसाठी नव्हती,
ती संघर्षासाठी होती.
जो आपलं शाश्वत उद्दिष्ट विसरतो
आणि त्या उद्दिष्टांच्या
रक्षणासाठीचा संघर्ष विसरतो,
तो एक दिवस
जनतेकडून ही विसरला जातो.
उद्धवा याला माझा शिवसैनिक जबाबदार नाही त्याला तुझ सत्ता लोलूप नेतृत्व जबाबदार आहे .
फक्त शिवसैनिकांचा
— बाळासाहेब ठाकरे
- अमोल पेडणेकर

